*आज बॉम्बे ब्लड ग्रुप धुळे अँडमिन सौ.मनिषा चौगुले मँम यांनी रक्तदान शिबीर आयोजन केले दिलसे सेल्युट व मानाचा मुजरा* *योग विद्याधाम धुळे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन* °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° *योग विद्याधाम धुळेचे संस्थापक योगगुरु डॉ गंगाधर बारचे सर यांचा 80 वा जन्मदिन मोठ्या उत्साहात योग विद्याधाम धुळे येथे साजरा करण्यात आला, त्यानिमित्ताने योग विद्याधाम येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले, त्यात 25 ते 30 साधकांनी रक्तदान केले, योग विद्याधामचे कार्याध्यक्ष डॉ जितेंद्र भामरेसर यांच्या मार्गदर्शनात सदर शिबिराचे आयोजन प्रमुख म्हणून योगशिक्षिका सौ मनिषा चौधरी यांना नेमण्यात आले होते, सौ मनिषा चौधरी यांनी अतिशय सफल असे रक्तदान शिबिर आयोजन केले, त्याबद्दल सौ मनिषा चौधरी यांना सफल आयोजक म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.* *सदर शिबिर सफल आयोजनासाठी डॉ अविनाश धर्माधिकारीसर, जयंत विभांडीक, श्री विजय पाटील, श्री लक्ष्मण दहिहंडे, भालचंद्र नेरपगार, संदीप कुळकर्णी, स्वप्निल पवार, विश्वनाथ सोमवंशी, स्मिता पाटील, सौ वैशाली काटे आदिंनी अनमोल सहकार्य केले.*